मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीयर कोर्सेसचे (आयएमसीसी) संचालक म्हणून डॉ. संतोष देशपांडे यांची पुणे विद्यापीठाच्या निवड समितीने निवड केली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आज संस्थेच्या मुख्य कार्यालयात डॉ. देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. 

डॉ. देशपांडे हे आत्तापर्यंत आयएमसीसीचे प्रभारी संचालक म्हणून काम पहात होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत.

किर्लोस्कर फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या 'स्वच्छ सुंदर शाळा' स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरुप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलला प्रादेशिक भाषा माध्यमाच्या शाळांच्या गटात प्रथम क्रमांक तर इंग्रजी भाषा माध्यम शाळा गटात बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलला द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

© 2016

Search