MES Boys High School and Junior College, Pune

Established 23 September 1860

No. of Students 1781

1214-1215 Sadashiv Peth, Pune, 411030
+ (91) (020) 41038152
hm.bhs@mespune.in
https://www.fb.com/bhavehighschool

शाला समिती

श्री. भालचंद्र पुरंदरे   -  अध्यक्ष
डॉ. सौ. मानसी भाटे   -  महामात्र
श्री के. एन. अरनाळे  -  मुख्याध्यापक
१) राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने स्थापन झालेली पुण्यातील पहिली शाळा म्हणजे म.ए.सो. मुलांचे विद्यालय.
१५३ वर्षांची उज्वल परंपरा लाभलेल्या प्रशालेची भव्य दगडी वास्तू  अत्याधुनिक भौतिक सोयीसुविधांनी युक्त आहे.  
२) आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, कै. वामन प्रभाकर भावे, कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर असे नामवंत निस्पृह संस्थापक असणारी प्रशाला.
३) आचार्य अत्रे, इतिहासाचार्य राजवाडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, नटवर्य श्रीराम लागू, डॉ. नीतू मांडके, गणितज्ञ नरेंद्र करमरकर यासारख्या असंख्य माजी विद्यार्थ्यांची गौरवशाली परंपरा.
४) इ. १० वी, इ. १२ वी परीक्षेतील उज्वल यशाची परंपरा.
५) इ. १० वी, इ. १२ वी प्रगत, पात्रतेचे किमान निकष पार करून न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र जादा तासांची सोय.
६) विषय तज्ञांची व्याख्याने व अभ्यासविषयक शिबिरांचे आयोजन.
७) सक्रीय पालक शिक्षक संघ.
८) रात्र अभ्यासिकेची सोय.
९) स्वतंत्र, सुसज्य, आधुनिक प्रयोगशाळा व संगणक कक्ष
१०) ग्रंथ संपदेने संपन्न विशाल ग्रंथालय
११) चित्रकला वर्ग, भव्य क्रीडांगण.
१२) “टेक्निकल वर्ग” विषय शिक्षणाची सोय.
१३) इंग्रजी, हिंदी, संस्कृत, गणित, चित्रकला, शिष्यवृत्ती, एम. टी. एस., एन. एम. एम. एस., एन.टी.एस. इत्यादीसाठी जादा तास व मार्गदर्शनाची सोय.
१४) एन.सी.सी., हवाईदल शाखा.
१५) प्रगत तज्ञ शिक्षक प्राध्यापक वर्ग.
१६) एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या सहाय्याने वर्गाध्यापन.
१७) उत्साही, सतत कार्यरत प्रशासाकीय वर्ग.
१८) वर्षभरातील शालेय उपक्रम, परीक्षा यांचे नियोजन दर्शविणारी विद्या दैनंदिनी प्रत्येक विद्यार्थ्यास दिली जाते.
१९) सहशालेय उपक्रम, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम समारंभ संपन्न.
२०) अनेक समाजाभिमुख योजना, उपक्रम यांचे आयोजन उदा. सावित्री धान्य योजना, मातृदिन सोहळा.
२१) स्वच्छ भारत, सुंदर विद्यालय योजना कार्यान्वित
 Standard  2013 - 2014   2014 - 2015   2015 - 2016 
SSC 95.98% 95.73% 99.25%
HSC 100% 100% 100%
  Scholarship 
77.27% 64.86% --
© 2016

Search