mes preprimary school, Sadashiv Peth, Pune

Established on 18th June 1979

No. of Students : 399

1453-1454 Sadashiv Peth, Pune, 411030.
+ (91) (020) 24482557

अध्यक्ष
डॉ.मा.ज.भट

सदस्य
डॉ.केतकी मोडक
श्री.स.आ.आंबर्डेकर

महामात्र
प्रा.चित्रा नगरकर

शाखा प्रमुख
श्रीमती मेधा दाते

 • १५६ वर्षाची उज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या ज्ञानवृक्षाची शाखा.
 • मुलांना अभ्यासाचे ओझे वाटू नये म्हणून प्रकल्प पद्धतीवर आधारीत हसत खेळत शिक्षण.
 • शाळेत प्रवेश घेतला कि इयत्ता १ ली साठी भावे प्राथमिक शाळा या आदर्श शाळेत थेट प्रवेश.
 • बालगोपाळांसाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत तसेच खेळण्यासाठी सुरक्षित अंगण.
 • इयत्ता १ लीची पूर्वतयारी करण्याचे दृष्टीने मोठ्या गटात विशेष प्रयत्न.
 • लहानपणापासून विद्यार्थ्यांना इंग्रजीची गोडी लागावी यासाठी इंग्रजी संभाषण कौशल्य वर्ग, सेमी इंग्रजी.
 • निरीक्षणशक्ती, एकाग्रता वाढीस लागणारे शैक्षणिक खेळ, साहित्य.
 • सण-समारंभ व विविध प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख.
 • प्रोजेक्टर, सीडी, कॅसेटचा भरपूर वापर आणि अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा.
 • विद्यार्थ्यांचे कुतूहल जागृत होण्यासाठी मोठ्या गटाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विज्ञान वर्ग.
 • इयत्ता १ ली ते ४ थी साठी स्वतंत्र अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा.
 • विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न बनविता आदर्श विद्यार्थी घडविणारी शाळा.
 • इयत्ता १ ली पासून सेमी इंग्लिशमध्ये प्रवेश.
 • बालवाडी ते इयत्ता १० वी पर्यंत शाळा.

मुलांचा धीटपणा, पाठांतर क्षमता, स्मरणशक्ती वाढण्यासाठी, शारीरिक व भावनिक विकास उत्तम होण्यासाठी गीता पाठांतर स्पर्धा, मनाचे श्‍लोक स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेण्यात येतात. यामुळे विद्यार्थी फक्त अभ्यासातच नाही तर कला, नाट्य, संगीत, वक्तृत्व, क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये लहानपणीच तयार होतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या इतर कौशल्याच्याही वैयक्तिक निरीक्षण नोंदी ठेवण्यात येतात.
पालकांचा सहभाग शाळेमध्ये वाढावा यासाठी प्रत्येक वर्गानुसार पालकांच्या सभा आयोजित करून त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि त्याचे निराकरण केले. पालकांसाठी शैक्षणिक साधननिर्मिती कार्यशाळेच्या अंतर्गत अक्षरांचे तक्ते तयार करणे, कथाकथन स्पर्धा, पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे उपक्रमही घेण्यात आले. शिक्षकांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी व नवनिर्मितीचा आनंद त्यांना मिळावा यासाठी वर्गासजावट, उत्कृष्ट नियोजन अशा स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्यांना पारितोषिकेही देण्यात आली.

सण समारंभ

दरवर्षी शाळेत पालखीपासून सगळे सण-समारंभ, उत्सव, थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे केले जातात. यातून मूळ संस्कारांचे महत्व मुलांना कळावे, आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने हे सण साजरे केले जातात. त्याचप्रमाणे दहीहंडी, पालखी सोहळा, दिवाळीत किल्ले, आकाशकंदील तयार करणे अशा सर्व कार्यक्रमात विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात.

इंग्रजीची ओळख

विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच इंग्रजी भाषेची ओळख व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळी चित्रे, गाणी, गोष्टी, तक्ते यांच्या माध्यमातून इंग्रजी भाषेची ओळख व संभाषण कौशल्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच मोठ्या गटाला लेखनाचा सरावही देण्यात आला.

बालवाचनालय

मुलांना लहानपणापासूनच पुस्तकांची व वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांचा भाषिक विकास व्हावा या उद्देशाने तीन वर्षापूर्वी चालू केलेल्या बालवाचनालय या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या प्रकल्पांतर्गत पालकांनीही शाळेला पुस्तके देणगीरूपाने देऊन शाळेवरील लोभ व्यक्त केला.

पालकांसाठी उपक्रम

विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांसाठीही दर महिन्याला पालकसभा, पालक-शिक्षक सहली, पालकशाळा, पालकांसाठी कृतीसत्र असे उपक्रम घेतले जातात. पालकप्रबोधिनीत यावर्षी मुलांना घरी गोष्टी कशा सांगाव्यात आणि त्यांच्याशी संवाद कसा साधावा हा विषय डोळ्यांसमोर ठेवून पालकांसाठी प्रबोधनपर व्याख्याने आणि कृतीसत्रांचे आयोजन करण्यात आले आणि पालकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न केले. या सर्व उपक्रमातून पालकांनाही शाळेत आपल्या मुलाला काय शिकवले जाते याची माहिती मिळायला मदत झाली.

बाबा पालक मेळावा

विद्यार्थ्यांचे बाबा शाळेत शक्यतो कधीच येत नाहीत. बहुतेक वेळा आई पालकच शाळेत येतात. बाबा पालकांना शाळेच्या सर्व उपक्रमांविषयी माहिती व्हावी, त्यांचा शाळेतील सहभाग वाढावा यासाठी बाबा पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नवीन पिढीबरोबर आई बाबांनी कशा प्रकारे सुसंवाद साधावा व मुलांना आपला वेळ देताना आपल्या स्वतःमध्ये कोणते गुणात्मक बदल करावेत या विषयावर त्यांना श्रीमती सायली कुलकर्णी यांनी समुपदेशन केले. या मेळाव्याला बाबा पालकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.

आजी-आजोबा मेळावा

सध्या एकत्र कुटुंबपद्धती नसल्यामुळे लहान मुलांना आजी-आजोबांशी संवाद साधणे अवघड झाले आहे. त्यामुळे मुले एकाकी पडतात असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या दोघांमधील संवाद वाढावा या सामाजिक जाणिवेतून, शाळा पाहण्याच्या निमित्ताने आजी-आजोबा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला आजी-आजोबांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समुपदेशक श्रीमती केतकी कुलकर्णी व श्रीमती प्राजक्ता चिंचोलीकर यांनी मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी घरचे वातावरण कसे असावे या विषयावर समुपदेशन केले.

आनंद मेळावा

शाळेची ओळख बाहेरील विद्यार्थी/पालकांनाही व्हावी या हेतूने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुलांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल, पुस्तक विक्रीचे स्टॉल, दिवाळी साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच जंपिंग जॅक, पाळणा, मिकी-माऊस असे विविध खेळही मांडण्यात आले होते. प्रत्येक वर्गातही शाळेतील प्रकल्पांची पालकांना माहिती व्हावी या हेतूने प्रकल्पांची मांडणी केली होती. विद्यार्थ्यांसाठी पपेट शोचे आयोजन करण्यात आले.

शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळा

इयत्ता पहिलीत जाण्याच्या दृष्टीने घरच्या घरी पालकांना शैक्षणिक साधने कशी तयार करता येतील हे शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळेमध्ये पालकांना शिकविण्यात आले. आपल्या मुलांना घरी नक्की काय शिकवता येईल हा उद्देश या कार्यशाळेमध्ये होता. यामध्ये मराठी शब्द दृढीकरण तक्ता तयार करणे आणि अक्षरावरून शब्द तयार करणे या गोष्टी पालकांना शिकविण्यात आल्या.

सेविकांची कार्यशाळा

नवीन सेविकांनाही शाळेमध्ये शिक्षिकांना मदत करावी लागते. त्यांच्यातील आत्मविश्‍वास वाढावा यासाठी त्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये अभिनय गीत, प्रार्थना, भजन, नवीन गाणी तयार करणे, चाली शिकविणे या गोष्टीतून सेविकांना मार्गदर्शन करण्यात आले.

उन्हाळी शिबीर

या वर्षी २ ते ६ वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांची उन्हाळी सुट्टी मजेत जावी यासाठी एका उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हस्तकला, चित्रकला, गाणी, गोष्टी यांचा अंतर्भाव करण्यात आला. तसेच शिबिरातील मुलांसाठी एका छोट्या सहलीचेही आयोजन करण्यात आले. शिबिराला मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला.

सामाजिक बांधिलकी

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीचा वसा हाती कसा घ्यावा यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षिकांनी जमवलेले दोन क्विंटल तांदूळ आणि दहा किलो कडधान्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या श्रीमती जोशीराव मॅडम यांना प्रदान केले. यातूनच सामाजिक बांधिलकीची जपणूक शाळेकडून करण्यात आली.
© 2016

Search