MES Sou Vimlabai Garware High School, Pune

Established in 20th July 1925

No. of Students 1441

Maharshi Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
+ (91) (020) 25434326
hm.vghs@mespune.in
https://www.fb.com/MESVGHS

अध्यक्ष
श्रीमती आनंदी पाटील

सदस्य
श्री.आ.वा. कुलकर्णी
श्री.दे.चं. भिशीकर
डॉ.पी.बी.बुचडे
श्री.स.आ.आंबर्डेकर

महामात्र
श्री.सु.शि. गाडे

शाखा प्रमुख
श्री.अ.के. वाघमारे

 • ९२ वर्षांची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा
 • तज्ञ, अनुभवी, उच्चशिक्षित अध्यापक वर्ग
 • सर्वांगीण प्रगतीसाठी विध्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष
 • इ.५ वी तो इ.१० वी सेमी इंग्रजी अभ्यासक्रमाची सोय
 • एन.टी.एस., एम.टी.एस., राष्ट्रभाषा सभा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गणित, सायन्स, सायबर, सामान्य ज्ञान, ऑलिम्पियाड, संस्कृतीज्ञान, शिष्यवृत्ती, अभ्यासरत्न यासारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची उज्ज्वल
 • यशप्राप्ती
 • समृद्ध ग्रंथालय
 • सुसज्ज प्रयोगशाळा
 • इलेक्ट्रीकल, फॅब्रीकेशन प्लंबिंग, इंजीनिआरिंग डिझाईन इ.प्रशिक्षणासाठी अद्ययावत लॅब
 • अद्ययावत संगणक कक्ष व संगणक प्रशिक्षणाची सोय
 • गुणवंत विद्यार्थी शिबीर व प्रेरणा वर्ग
 • विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निबंध, गायन, वक्तृत्व, नाट्य, संगीत इ.उपक्रमांचे आयोजन
 • उत्तम चित्रकला कक्ष, एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षांची सुविधा
 • विविध भारतीय क्रीडा प्रकारांचे व क्रिकेटच्या प्रशिक्षणाची सोय
 • व्यक्तिमत्व विकास केंद्र व समुपदेशन
 • एन.सी.सी.उज्ज्वल परंपरा
 • हस्तलिखिते, नियतकालिक यातून लेखन कौशल्याला भरपूर वाव
 • मुलींचे घोषपथक, तसेच मुलामुलींसाठी टिपरी व ध्वजपथक व भूषणास्पद ढोलताशा पथक
 • संगणक प्रणालीतर्फे विद्यार्थ्यांना संगणकीय निकालपत्रे, संगणकीय कार्यालयीन कामकाज
 • ई-लर्निंग आंतरशालेय स्पर्धा, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी

वृक्षारोपण

शनिवार दि.२.७.२०१६ रोजी प्रशालेतील एन सी सी  मधील २१ छात्रानी व शिक्षकांनी पौड नानेगाव येथे शेतामध्ये व बांधावरती वृक्षारोपण केले. वृक्षांचे महत्व पर्यावरण विषय जनजागृती वृक्षसंवर्धन करणे हि काळाची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करून अतिशय उत्साहात हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री.दराडे सर यांनी केले.तसेच सहकारी शिक्षक श्री.जायभाय सर व हिले यांनी मार्गदर्शन केले.


आपत्ती व्यवस्थापन

दि.२०.७.२०१६  रोजी प्रशालेत डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन व पुणे मनपा अग्निशमन केंद्र व प्रशाला यांचे तर्फे प्रशालेत दुपार विभागात अग्निशामक दलातर्फे आग विझविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच फायर ब्रिगेड च्या जवानांनी पाण्याचे विविध प्रकारचे फवारे उडवून विद्यार्थ्यांची मने जिंकली. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख श्री.दराडे सर यांनी नियोजन केले. सहकारी शिक्षिका श्रीम.सुवर्णा काळे व श्रीम.अनघा बोत्रे यांनी मार्गदर्शन केले.


आपली सूर्यमाला

इ.८ वी शिवनेरी व इ.८ वी तोरणा या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपली सूर्यमाला हा कृती उपक्रम दि. २६.७.२०१६ रोजी सादर केला.यामध्ये सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ८ ग्रह यांनी समोर येऊन आपापली माहिती सांगितली व नंतर आपल्या कक्षेत जाऊन उभे राहिले व त्यानंतर सर्व ग्रह स्वत:भोवती व सूर्याभोवती फिरताना दाखविले. या कृतीसाठी श्रीम.सुवर्णा काळे व श्रीम.उषा बगाडे यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.काजरेकर मडम यांच्या प्रोत्साहनामुळे हि कृती अतिशय सुंदर रित्या सदर केली गेली.


ग्रंथ प्रदर्शन

दरवर्षी आमच्या प्रशालेत ग्रंथ प्रदर्शन भरविले जाते.या प्रदर्शनात दरवर्षी ग्रंथालयातील एका विषयाची पुस्तके मांडलीजातात. तसेच त्या विषयाला अनुसरून चार्टस मुलांचे प्रोजेक्टही मांडले जातात. यावर्षी हे प्रदर्शन दि.२७ जुलै ते २ ऑगस्त २०१६ या कालावधीत भरविले गेले. यावर्षी भूगोल या विषयाची पुस्तके चार्टस व मुलांनी केलेली मोडेल्स प्रदर्शात मांडली होती. तसेच ऑस्ट्रेलिया इटली व जर्मनी या विषयाची पीपीटी इ.८ वी च्या मुलींनी तयार केली होती. ती प्रोजेक्टर वर दाखवून अबोली साने इ.८ वी शिवनेरी हिने माहिती सांगितली. तसेच या वर्गाने सूर्यमाला तयार केली होती.त्याबद्दलही माहिती सांगितली होती.विद्यार्थी व शिक्षकांनी या ग्रंथ प्रदर्शनाला प्रतिसाद दिला.
Academic Year SSC
2013 - 2014 99.04%
2014 - 2015 99.0%
2015 - 2016 90.91%
© 2016

Search